WAVES म्हणजे काय?

World Audio Visual & Entertainment Summit

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू झालेला आंतरराष्ट्रीय उपक्रम. माध्यमे, मनोरंजन, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट आणि सर्जनशील उद्योग एकाच व्यासपीठावर.

‘Connecting Creators, Connecting Countries’WAVES ची संकल्पना
१–४ मे

२०२५, मुंबई – पहिली WAVES परिषद

३,०००+

WAVES Bazaar मधील व्यावसायिक बैठका

₹१,३२८ कोटी+

मूल्याचे व्यवहार नोंदवले गेले. कथा, कंटेंट, बौद्धिक संपदा, निर्माते आणि गुंतवणूकदार यांना जोडण्यावर भर.

स्रोत: केंद्र सरकारने दिलेली WAVES २०२५ ची माहिती.

दिवाळी अंकांना उपयोग

शंभर वर्षांहून अधिक काळाचा कथांचा ठेवा – आधुनिक माध्यमांसमोर

दिवाळी अंकांमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळ तयार झालेला कथांचा, साहित्याचा आणि कल्पनांचा अनमोल ठेवा आहे. हा साहित्यिक ठेवा आधुनिक माध्यमे आणि मनोरंजन उद्योगांसमोर प्रभावीपणे मांडल्यास नव्या संधी निर्माण होऊ शकतात. WAVES मध्ये कथा, कंटेंट, बौद्धिक संपदा, निर्माते आणि गुंतवणूकदार यांना जोडण्यावर भर देण्यात आला.

०१

मराठी कथांची जागतिक ओळख

निवडक कथांचे डिजिटल कॅटलॉग – चित्रपट, OTT आणि ॲनिमेशन निर्मात्यांपर्यंत.

०२

साहित्याचे रूपांतर

चित्रपट, वेबमालिका, नाटके, ध्वनिनाट्य आणि लघुपटांसाठी सहकार्य.

०३

भाषांतर आणि आंतरराष्ट्रीय वितरण

प्रकाशक, अनुवादक आणि कंटेंट कंपन्यांशी संपर्क.

०४

नवोदित सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन

दिवाळी अंकांतून पुढे येणारे लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार आणि डिजिटल कथाकार – आधुनिक सर्जनशील उद्योगांशी जोड.

०५

मराठी साहित्याचा डिजिटल शोकेस

निवडक साहित्यकृती, ऐतिहासिक मुखपृष्ठे आणि सांस्कृतिक प्रवासाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शन.

प्रस्ताव

Marathi Diwali Ank – 117 Years of Storytelling

येत्या वर्षात WAVES किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये या संकल्पनेवर आधारित विशेष दालन किंवा प्रदर्शन उभारण्याचा प्रस्ताव आहे.

त्यासाठी अंकालयमधून उपलब्ध होईल –

  • दिवाळी अंकांचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण
  • साहित्यकृतींची डिजिटल सूची
  • हक्कधारकांची माहिती

ज्या मराठी कथा दशकानुदशके घराघरांत वाचल्या गेल्या, त्या उद्या जगभरातील प्रेक्षकांपर्यंत